होऊन जाऊ द्या, सर्वच पक्षांनी स्वबळावर लढावं -अजित पवार

July 4, 2014 6:12 PM1 commentViews: 2160

nasik_ajit_pawar 04 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. पण राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या आखाड्यात सगळ्यांनी स्वबळावर लढावं असं आव्हानच दिलंय. तसंच अजित पवारांनी थेट मित्र काँग्रेसलाच इशारा दिलाय.

निम्म्या जागा मिळाल्या तरच विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करावी, असं अजित पवार यांनी म्हटलंय. हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेत काँग्रेसपेक्षा आमच्या अधिक जागा आहेत.

आम्ही काही जास्त जागा मागत नाही पण 144, 144 जागा कराव्यात एवढीच आपली मागणी असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. आणि जर ही मागणी पूर्ण होत नसेल तर सर्वच जागांवर लढण्याची तयारी ठेवू असा इशाराच त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mondrahul

    1 No. Dada

close