भाववाढीचं संकट टळलं, सिलेंडर महागणार नाही !

July 4, 2014 9:20 PM0 commentsViews: 1163

43cylinder-price-hike04 जुलै : रेल्वे भाडेवाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सिलेंडरच्या दरात वाढ होणारं असं संकट घोंघावत होतं मात्र हे संकट तुर्तास टळलंय. अनुदानित एलपीजी सिलेंडर किंवा केरोसीनच्या दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असा निर्वाळा पेट्रोलियम सचिव सुभाष चंद्रा यांनी दिला.

त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पारीख समितीच्या शिफारशींवर पेट्रोलियम मंत्रालय विचार करणार होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. सध्या गॅसच्या सिलेंडरवर दिल्या जाणार्‍या अनुदानामुळे सरकारी तिजोरीवर 70 हजार कोटींचा भार पडतो.

तो कमी करण्यासाठी पारीख समितीनं उपाय सुचवले होते. त्यानुसार सिलेंडर तब्बल 250 रुपयांनी तर केरोसीनचे दर लिटरमागे 4 ते 5 रुपयांनी महागण्याची शक्यता होती. पारख समितीच्या शिफारशी पेट्रोलियम मंत्रालयाने स्वीकारल्या असत्या तर ही दरवाढ अटळ आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close