शिवसेनेने केली नारायण राणेंविरोधात तक्रार

April 23, 2009 1:36 PM0 commentsViews: 2

23 एप्रिल, कणकवली शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार परशुराम उपकर यांनी नारायण राणेंविरोधात कणकवलीत तक्रार नोंदवली आहे. ' वातावरण बिघडू नये याची पोलिसांनी काळजी घ्यावी. नाही तर या शिवसैनिकांना पुन्हा मुंबईत जाऊ देणार नाही ', असा इशारा नारायण राणे यांनी काल कणकवलीत दिला होता. याविरोधात संजय राऊत आणि परशुराम उपरकर यांनी तक्रार नोंदवली आहे. ' नारायण राणे दहशतीचं राजकारण करत आहेत, ' असं या तक्रारीत म्हटलं आहे. पण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलंय. यावरून कणकवलीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. नारायण राणेंचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या हत्त्येचा आरोप शिवसेनेवर केला असल्यामुळे कणकवलीत नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कोकणात आले होते. शिवसैनिकांना इशारा देताना शिवसैनिक जर आक्रमक झाले तर सेनेच्या कोकणातल्या जुन्या घटना प्रकाशात आणाव्या लागतील असंही राणे म्हणाले होते.

close