अखेर ‘त्या’ 46 नर्सेस मायदेशी परतल्या

July 5, 2014 1:19 PM0 commentsViews: 1490

keral_nurrses05 जुलै : इराकमध्ये बंडखोरांच्या धुमश्चक्रीमुळे मोसूलमध्ये अडकलेल्या 46 भारतीय नर्सेस अखेर मायदेशी परतल्या आहेत. नर्सेस आणि इतर 130 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान मुंबईहून कोचीेत दाखल झालंय. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी कोची एअरपोर्टवर नर्सेसचं स्वागत केलं. नर्सेसचे नातेवाईकही एअरपोर्टवर हजर आहेत.

तब्बल 23 दिवसांनंतर नर्सेस आयसीएस या दहशतवादी संघटनेच्या तावडीतून सुटून सुखरूप भारतात पोहोचल्यात. कोची एअरपोर्टवर उतरल्यानंतर या नर्सेसनी केंद्र सरकारचे आभार मानले. कोचीला येण्यापूर्वी हे विमान मुंबईत थोडा वेळ थांबलं होतं.

आता हे विमान कोचीहून हैदराबादला जाईल. तिथं 76 भारतीय कामगारांना उतरवलं जाईल आणि तिथून दिल्लीला जाईल. शुक्रवारी दहशतवाद्यांच्या तावडीतून या नर्सेसची सुटका झाली होती. संध्याकाळी मोसूलमधील अर्बिल विमानतळावरून एअऱ इंडियाच्या या विशेष विमानाने उड्डाण केलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close