मंगळवेढ्यात 11 गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

April 23, 2009 1:56 PM0 commentsViews: 2

23 एप्रिल, मंगळवेढा सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातल्या 11 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आज या गावातील मतदान केंद्रावर मतदान करायला कुणीही फिरकलंच नाही. आसबेवाडी, सलगर, लवंगी, जिंती या गावासहित अकरा गावं या बहिष्कारात सामील आहे. मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणार नाही असा पवित्रा या गावकर्‍यांनी घेतला होता. त्यामुळं या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

close