सोलापुरात मतदान केंद्रातच पक्षाच्या एजंटला मारझोड

April 23, 2009 2:35 PM0 commentsViews: 4

23 एप्रिल, सोलापूरसोलापूरमध्ये मतदान केंद्रावर एका बोगस पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आली. सुशीलकुमार शिंदेंच्या मतदारसंघातल्या सुशीलकुमार शिंदे उर्दू शाळा मतदान केंद्रात हा काँग्रेसचा बोगस एजंट हजर होता. बहुजन समाज पार्टीने याला हरकत घेतली. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून या बोगस एजंट ला मारहाण करण्यात आली. मतदान केंद्रांवर कोणत्याही उमेदवाराच्या नावाचा बोर्ड अगर निवडणूक चिन्ह नेता येत नाही. तसंच या शाळेचं नाव मतदानाच्या दिवशी झाकण्यात आलं नव्हतं. यामुळे या केंद्रावर मतदान पुन्हा घ्यावं, अशी मागणीही बसपानं केली. दरम्यान, माढाचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी 20 ठिकाणी फेरमतदान करण्याची मागणी केली.

close