क्रिकेटच्या पंढरीत दिग्गजांचा सामना

July 5, 2014 9:33 PM0 commentsViews: 1839

05 जुलै : क्रिकेट जगताचा दैवत सचिन तेंडुलकर आणि महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डस मैदानावर दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांसमोर उभे ठाकले. लॉर्डस मैदानाच्या 200 व्या वाढदिवसानिमित्त आज ही विशेष मॅच खेळली गेली. एमसीसी आणि शेष विश्व या दोन टीम्समध्ये ही विशेष मॅच पार पडली. यात एमसीसीचा कॅप्टन सचिन तेंडुलकर, तर शेष विश्व टीमचा कॅप्टन शेन वॉर्न होता. भारतीय संघाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड सचिनच्या टीममध्ये असून विरेंद्र सेहवाग , युवराज सिंग हे दोघेही शेन वॉर्नच्या टीममध्ये आहेत. ब्रायन लारा, शाहिद आफ्रिदी, ब्रेट ली ,मुथय्या मुरलीधरन या दिग्गज खेळाडूंचाही या मॅचमध्ये समावेश होता. संपूर्ण क्रिकेट जगतासाठी ही मॅच नक्कीच एक अविस्मरणीय पर्वणी ठरलीय. याच मॅचचे हे क्षण चित्र…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close