डाव्या पक्षांशी आघाडी होऊ शकते – रामविलास पासवान

April 23, 2009 3:18 PM0 commentsViews: 1

23 एप्रिलनिवडणुकीनंतर डाव्या पक्षांशी आघाडी होऊ शकते, अशी शक्यता लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी व्यक्त केली. ते बिहारमध्ये बोलत होते. रामविलास पासवान यांच्या या व्यक्तव्यांमुळे चौथ्या आघाडीची शक्यता मावळली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी काँग्रेसवर टीका केलीय. काँग्रेसनं स्वतःचा जनाधार वाढवावा, पण जनाधार वाढवताना इतर धर्मनिरपेक्ष पक्षांना फटका बसेल अशी कृती करू नये असं पासवान यांनी म्हटलंय. बिहारमध्ये काँग्रेस स्वबळावर लढतेय. तर पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि लालूंची आरजेडी एकत्र आलीय.

close