तामिळनाडूनमध्ये भिंत कोसळून 11 ठार

July 6, 2014 3:21 PM0 commentsViews: 249

wall collapse

06  जुलै : तामिळनाडूमधील थिरुवल्लूर जिल्ह्यात आज सकाळी एका गोडाऊनच्या कम्पाऊंडची भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे ही 20 फूट उंचीची भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना एकाला वाचवण्यात यश आलं आहे. गोडाऊनमध्ये काम करणारे अजून काही मजूर खाली अडकल्याची शक्यता आहे.

दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी या दुर्घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची आणि जखमींच्या नातेवाईकांना पन्नास हजारांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

मागच्याच आठवड्यातही चेन्नईमध्ये अकरा मजली बिल्डिंग कोसळून 61 जणांचा जीव गेला. या घटनांचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री जयललिता यांनी पोलीस सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close