मुरुडच्या समुद्रात 6 जण बुडाले

July 6, 2014 6:26 PM0 commentsViews: 3385

Murud Janjira06  जुलै :  रायगड जिल्ह्यातल्या मुरुडच्या समुद्रात बुडून 6 पर्यटकांचा आज (रविवारी) मृत्यू झाला आहे.

सर्व पर्यटक मुंबईतल्या चेंबूरचे रहिवासी आहेत. समुद्रात कोणीही पोहायला जाऊ नये अशी धोक्याची सूचना जिल्हा प्रशासनानं दिली होती, तरीही हे 6 जण पोहायला गेले. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. दिनेश पवार, दिलीप गोळे, संजय पांचाळ, शंकर चव्हाण, विनोद अलय, रोहित अशी या मुलांची नावं आहेत. स्थानिकांच्या मदतीनं या सर्वांचे मृतदेह शोधण्यात आले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close