ज्ञानोबा-सोपानकाकांची बंधूभेट

July 6, 2014 7:35 PM0 commentsViews: 323

06  जुलै :  तुकाराम महाराजांची पालखी पिराची कुरोलीकडे मार्गस्थ झाली. आज ठाकुरबुवांच्या समाधीजवळ माऊलींचं गोल रिंगण पार पडलं. तर तोंडले बोंडले इथे तुकोबांचा धावा असेल. तुकोबांचा आजचा मुक्काम पिराची कुरोली इथेच असेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वेळापूर इथला विश्राम संपवून भंडी शेगावकडे रवाना झाली.

दरम्यान, तोंडले बोंडलेजवळील टप्प्यावर ज्ञानेश्वर माऊली आणि सोपानकाका यांची बंधूभेट होईल. ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम भंडी शेगाव इथे असेल. या दोन्ही पालख्या मानाचा नारळ एकमेकांना दिल्यानंतर मार्गस्थ होतात. त्यानंतर माऊलींची पालखी आणि त्यामागून सोपानकाकांची पालखी पंढरपूरकडे रवाना होतात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close