ताडोब्यात आढळले 32 बछडे

July 6, 2014 7:58 PM0 commentsViews: 452

महेश तिवारी, चंद्रपूर

06  जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातल्या जगप्रसिध्द ताडोबा जंगलात नुकतेच वाघांचे तब्बल 32 बछडे आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक वाघांचे बछडे याच जिल्ह्यात जन्माला आल्याचं समोर येतं आहेत.

चंद्रपूरजवळच्या ताडोबा अभयारण्यात नुकतेच हे बछडे आढळून आले आहेत. सध्या ते इथे निर्धास्तपणे वावरतायत. ब्रह्मपूर वनविभागात सहा तर मध्य चांदा वनविभागामध्ये सहा वाघांचे बछडे नुकतेच आढळले आहेत. ताडोबाच्या वन्यजीव व्यवस्थापनाने या वाघांच्या बछड्यांचं संरक्षण चांगल्या पद्धतीने केलं आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाचा जन्मदर सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रजननासाठी अनुकुल असं बांबूंचं जंगलही या जिल्ह्यात आहे. गडचिरोलीतही असंच बांबंूचं जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने इथं वाघांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
ताडोबा प्रकल्पात पर्यटकांची गर्दी आता वाढु लागली आहे. त्यामुळे वाघांचे हे बछडे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. वाघांच्या बछड्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close