दाऊदची बहिण हसीना पारकरचा मृत्यू

July 6, 2014 8:27 PM0 commentsViews: 1891

hasina parkar 06  जुलै : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मोठी बहिण हसीना पारकरचं आज (रविवारी) हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

हसीना पारकर मुंबईतल्या डोंगरी भागात राहत होती. हबीब हॉस्पिटलमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून हसीना यांच्या अंत्यसंस्कारावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. हसीनावर खंडणी, धमकावणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close