दुसर्‍या टप्प्यात देशात 55 टक्के तर राज्यात 56 टक्के मतदान

April 23, 2009 3:52 PM0 commentsViews: 7

23 एप्रिलआज देशात 13 राज्यांमध्ये दुसर्‍या टप्प्यातलं मतदान पार पडलं. हे मतदान तिन्ही टप्प्यामधलं मोठ्या प्रमाणावरचं मतदान होतं.पहिल्या टप्प्याच्या तुलनेत हे मतदान शांततेत झालं आहे. देशात सरासरी 55 टक्के मतदान झालं तर महाराष्ट्रात 56 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. दुसर्‍या टप्प्यातल्या 141 जागांपैकी 140 जागांवर आज मतदान झालं आहे. मणिपूरमधल्या एका जागेसाठी कालच मतदान झालं होतं.मतदान समाधानकारक झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मतदानादरम्यान हिंसाचाराच्या आठ घटना घडल्या. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी मतदानात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. झारखंडच्या गिरीध जिल्ह्यात सरकारी अधिकार्‍यांच्या गाडीवर नक्षलवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. त्यात दोन निवडणूक अधिकारी जखमी झाले आहेत. आणखी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. बिहारमध्ये पूर्व चंपारण जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या लँडमाईनच्या स्फोटातून सीआरएफचे जवान थोडक्यात बचावले. बिहारमध्ये 46 तर झारखंडमध्ये काही ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. आसाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या चार वेगवेगळ्या हल्ल्यांत 1 ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. तर ओरिसामध्ये पास्को स्टील प्रकल्पाला विरोध करणार्‍या गावकर्‍यांनी मतदानावार बहिष्कार टाकला होता. देशातल्या 166 राजकीय पक्षांच्या 2 हजार 41 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. राहुल गांधी,शरद पवार, रामविलास पासवान, कमलनाथ, सुषमा स्वराज, यासारख्या दिग्गजांचं भवितव्य व्होटिंग मशिनमध्ये बंद झालं. देशभरातली मतदानाची टक्केवारी -आंध्र प्रदेश – 68 टक्के आसाम – 63 टक्के ओरिसा – 55उत्तर प्रदेश – 44 टक्के झारखंड – 45 टक्के महाराष्ट्र – 56 टक्के बिहार – 44 टक्‌के त्रिपुरा – 78 टक्के मध्य प्रदेश – 45 टक्के कर्नाटक – 51 टक्के गोवा – 55 टक्के जम्मू आणि काश्मीर – 46 टक्के

close