सोलापूर, बीड आणि सिंधुदुर्ग वगळता राज्यात शांततेत मतदान

April 23, 2009 3:55 PM0 commentsViews: 4

23 एप्रिलपश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या किरकोळ घटना घडल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मालवणमधल्या आंबेरी गावात शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. उदय वाक्कर या शिवसेनेच्या कार्यकर्त्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याची तक्रार मालवण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यावरुन हा वाद वाढून शिवसेनेचे शैलेश माळगांवकर यांनांही मारहाण झालीय. त्यांना ओरोसच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तर शिवसेनेच्या बुथवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करुन तोडफोड केलीय. यासंबधी शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मालवण पोलिस स्टेशनमध्ये एकमेकांविरुध्द तक्रार दाखल केल्यात. याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही.महाराष्ट्रातही काही ठिकाणी किरकोळ अनुचित प्रकार झाले. सोलापूरमध्ये मतदान केंद्रावर एका बोगस पोलिंग एजन्टला मारहाण करण्यात सुशिल कुमार शिंदे उर्दू शाळेमधल्या मतदान केंद्रात हा काँग्रेसचा बोगस एजंट हजर होता. बहुजन समाज पार्टीनं याला हरकत घेतली. पण त्यावर कोणतीही कारवाही झाली नाही म्हणून या बोगस एजंटला माराहाण करण्यात आली. मतदान केंद्रांवर कोणत्याही उमेदवाराच्या नावाचा बोर्ड अगर निवडणूक चिन्ह नेता येत नाही. तसंच या शाळेचं नाव मतदानाच्या दिवशी झाकण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या केंद्रावर मतदान पुन्हा घ्यावं, अशी मागणीही बसपानं केली आहे. दरम्यान, माढ्याचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी 20 ठिकाणी फेरमतदान करण्याची मागणी केलीय. जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासी सातपुड्यातील आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकला. पावरा आणि बारेला समाजाकरता असलेल्या योजना या आदिवासींपर्यंत पोहोचत नसल्याचा आदिवासींचा आरोप आहे. सोलापूरमध्ये आठ ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. सोलापूरमध्ये मंगळवेढा तालुक्यातल्या 11 गावांनी पाण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. राज्यभरातल्या मतदानाची सरासरी टक्केवारी – कोकण : 54 टक्केपश्चिम महाराष्ट्र : 56 टक्केउत्तर महाराष्ट्र : 54टक्केमराठवाडा : 56 टक्के

close