शाहरुख-सलमानची पुन्हा गळाभेट

July 7, 2014 3:38 PM0 commentsViews: 2600

07  जुलै :   काँग्रेस आमदार बाबा सिद्दिकी यांनी काल रविवारी मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांपासून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि दबंग स्टार सलमान खान एकत्र आले. दोघांनी एकमेकांची गळेभेट घेतली. मागील वर्षीही सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्यावेळी पहिल्यांदाच शाहरुख आणि सलमानने आपल्यातील वाद बाजूला ठेवून गळाभेट घेतली होती. गेल्यावर्षभरात  सलमान आणि शाहरुख यांच्यातील वाद मावळला. दोन्ही खान एखाद्या ऍवार्ड, कार्यक्रमातून एकमेकांची स्तुती करताना दिसून आले. आज पुन्हा एकदा शाहरुख आणि सलमानने एकमेकांची गळभेट घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close