केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पवार, पासवान आणि लालू घेणार डाव्यांची मदत

April 24, 2009 8:20 AM0 commentsViews: 5

24 एप्रिल लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसनं स्वतःचा जनाधार वाढवावा, पण जनाधार वाढवताना इतर धर्मनिरपेक्ष पक्षांना फटका बसेल अशी कृती करू नये, असं पासवान यांनी म्हटलंय. बिहारमध्ये काँग्रेस स्वबळावर लढतेय. तर पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि लालूंची आरजेडी एकत्र आली आहे. निवडणुकीनंतर डाव्या पक्षांशी आघाडी होऊ शकते,अशी शक्यता लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या व्यक्तव्यांमुळे चौथ्या आघाडीची शक्यता मावळली आहे, असं मत लोकजनशक्ती पार्टी अध्यक्ष रामविलास पासवान यांनी व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रीय जनतादल अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांची मदत घेऊ अशीच काहीशी भूमिका घेतली आहे. युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर सर्वसहमतीनं ठरवला जाईल, या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही पुरूच्चार केला आहे.

close