बजेटमुळे नोकरदारांचे ‘अच्छे दिन’ धोक्यात

July 7, 2014 5:07 PM0 commentsViews: 3369

2014_union_budget_07 जुलै : मोदी सरकारच्या पहिल्या बजेट अधिवेशनाला सुरुवात झाली असून लवकरच जनतेसाठी पहिलं बजेट सादर करणार आहे. पण मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमधून नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक मर्यांदांमुळे सरकारचे हात बांधले गेले आहेत.

इन्कम टॅक्सची मर्यादा 2 वरुन 5 लाख केल्यास तिजोरीवर 64 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे टॅक्सवरची सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गृहकर्जावरच्या व्याजावर सवलतीची मर्यादा मात्र दीड लाखांवरुन तीन लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. पण, कोणत्याही प्रकारच्या टॅक्समध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे आता बजेटमध्ये नेमकं काय पदरात पडणार आहे याची प्रतिक्षा सर्वांना लागून आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close