फ्रायडे रीलिज

April 24, 2009 9:26 AM0 commentsViews: 3

24 एप्रिल'सुंदर माझं घर' हा प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित मराठी सिनेमा आज मुंबईत रीलिज झाला आहे. हा सिनेमा कौटुंबिक आहे. एकत्र कुटुंबातली मुलगी सून म्हणून विभक्त कुटुंबात राहायला येते आणि तिथल्या लोकांना एकमेकांच्या जवळ आणते, अशी सिनेमाची स्टोरी आहे. राहुल मेहंदळे, मधुराणी गोखले-प्रभुलकर असे तरुण आणि दिलीप प्रभावळकर यांसारखे अनुभवी कलाकारही या सिनेमात आहेत. या सिनेमामधून मधुराणी पहिल्यांदाच संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पर्दापण करत आहे. याचबरोबर 'माय मॉम्स न्यू बॉयफ्रेण्ड' आणि 'शूट ऑन साईट' हे दोन इंग्लिश सिनेमाही रीलिजझाले आहेत. यापैकी 'माय मॉम्स न्यू बॉयफ्रेण्ड' हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून 'शूट ऑन साईट' हा सिनेमा 7 जुलैला लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारीत आहे.

close