पुणे विद्यापीठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ !

July 7, 2014 11:06 PM2 commentsViews: 1267

savitribai phule pune university07 जुलै : विधनासभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणा आणि निर्णयाचा धडका लावलाय. गेल्या 10 वर्षांपासून संघर्षात अडकलेल्या पुणे विद्यापीठाचा नामविस्ताराचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतलाय.

शिक्षणाचं माहेर घरं समजल्या जाण्यार्‍या पुणे जिल्ह्याच्या पुणे विद्यापीठाचं नाव आता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असं असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) विशेष बैठक घेऊन याबद्दलचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हरी नरके यांनी स्वागत केलंय. हा सावित्रीबाईंचा आणि स्त्रीवर्गाचा गौरव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यावं, अशी मागणी गेल्या 10 वर्षांपासून होत होती. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या सिनेट समितीने एकमताने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असं नाव देण्याचा प्रस्वाव मंजूर केला होता. सिनेट समितीने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता.

पण वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर राज्य सरकारने अखेर नामविस्तारावर शिक्कामोर्तब केलंय. 2004 सालापासून नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी लावून धरली होती. यासाठी अनेक आंदोलनं,मोर्चे काढण्यातही आली. अखेर राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर का होईना नामविस्ताराचा निर्णय घेतलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Raju Jadhav

  Though, Savitribaibai Phile was formerly uneducated, she was encouraged and motivated by
  Mahatma Jotiba Phule to study. Later on she became the first lady
  teacher of India in the school started by her husband. Life of
  Savitribai Phule as a teacher in the school at the time when upper caste
  orthodox people used to look down wasn’t easy.
  This is recognition for her work done.

 • https://www.facebook.com/ankush.samrut Ankush Samrut

  Not Any Changes in University because “Jis Desh mai Nam Kay liye Etna Time Liya Vo kya Top 100 aayenge…..”

  and why change the name of – University of Pune
  All Top University identify the Location Of Education Hub…..not Any Leaders Name….

  I Really Hate of The India Universities ….because not groth in Education only Student Admissions qty and Infrastrucures…….

close