शरियत कोर्ट बेकायदेशीर : सुप्रीम कोर्ट

July 7, 2014 8:33 PM0 commentsViews: 457

SUPREME_COURT3f07 जुलै : शरियतच्या नावाने चालणार्‍या मुस्लिमांच्या स्वतंत्र कोर्टाला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टाने दिला. तसंच व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारे फतवे, फर्मान बेकायदा असल्याचा निर्वाळाही कोर्टाने दिलाय.

दिल्लीतले वकिल विश्वलोचन मदन यांनी शरियत कोर्टाविरोधात याचिका दाखल केली होती. काझी किंवा मुफ्ती फतवा काढून मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकत नाहीत, असं याचिकेत म्हटलं होतं.

न्यायमूर्ती सी.के. प्रसाद यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. दारुल उलुम देवबंद या संस्थेतर्फे ऍड.शकील अहमद सय्यद यांनी यावेळी कोर्टाच्या बाजून युक्तीवाद केला. दरम्यान, कोर्टाच्या निकालाचा अभ्यास केल्यानंतर कायदेशीर पर्यायाचा विचार करू, असं मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close