रेल्वे बजेटकडून अपेक्षा

July 8, 2014 10:04 AM0 commentsViews: 368

323rail_budget201408 जुलै : रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. सोमवारी रेल्वेमंत्र्यांनी बजेटवरुन अखेरचा हात फिरवला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पदरात काय पडणार आहे याकडे उभ्या देशाचं लक्ष लागलंय.

रेल्वेमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत ?

– रेल्वेला सध्या 26,000 कोटी रुपयांची गरज आहे. हे पाहता फार मोठ्या घोषणा करणार नाहीत
– लोकांना खूश करणारे निर्णय न घेता, रेल्वेचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न
– इंधनासाठीचा वाढता खर्च पाहता सौर ऊर्जा आणि बायो डिझेलच्या वापरासाठी प्रयत्न किंवा प्लांटसाठी तरतूद
– वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, एशियन डेव्हलपमेंट बँककडून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न
– पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
– थेट परकीय गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आणण्यासाठी FDI पॉलिसी जाहीर करण्यात येण्याची शक्यता
– सुरक्षित आणि वेगवान प्रवास आणि प्रवाशांचं संरक्षण यावर भर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close