तिसर्‍या टप्प्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या मुंबईत सभा

April 24, 2009 10:31 AM0 commentsViews: 5

24 एप्रिललोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला आहे. 30 मे रोजी होणार्‍या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा आता मुंबई आणि ठाण्यात धडाडू लागल्या आहेत. सगळ्याच राजकीय नेत्यांनी प्रचार सभा घेण्यासाठी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. एकीकडे शरद पवार यांची आज मुंबईत सभा होणार आहे. तर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, मुलायमसिंग यादव आणि संजय दत्तही मुंबईत प्रचार करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याही मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार असल्याचं समजतंय.

close