रेल्वे मंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

July 8, 2014 1:53 PM2 commentsViews: 4210

08 जुलै : मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलं. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे आधुनिक करण्यावर भर दिलाय. तसंच रेल्वे भाडेवाढ न करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर 5 जनसाधारण, 5 प्रिमियम, 6 एसी, 27 एक्स्प्रेस, 8 पॅसेंजर रेल्वेची घोषणा केली आहे. त्यांच्या या भाषणातील ठळक मुद्दे

नव्या घोषणा

  • - रेल्वे मंत्र्यांनी सादर केलं रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देणारं रेल्वे बजेट
  • - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा
  • - 9 विभागांमध्ये धावणार हाय स्पीड गाड्या
  • - 5 जनसाधारण, 5 प्रिमिअम, 6 एसी, 27 एक्सप्रेस आणि 8 पॅसेंजर गाड्यांची घोषणा
  • - रेल्वे बजेमध्ये मुंबईकरांची यावर्षीही निराशा
  • - तिकीट वाढलं पण, नव्या सुविधा नाही
  • - मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेसची घोषणा
  • - मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेसची घोषणा
  • - नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी ट्रेनची घोषणा
  • - हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस घोषणा
  • - मुंबई-पटियाला ट्रेनची घोषणा
  • - पुणे-नागपूर आणि पुणे-अमृतसर नव्या साप्ताहिक गाड्या
  • - गदक-पंढरपूर नवीन गाडी
  • - कसारा-इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक
  • - सोलापूर-तुळजापूर नवीन लाईन ट्रॅक

नव्या सुविधा

  • - रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी परकीय गुंतवणूक
  • - सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून नवे रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार
  • - स्वच्छतेला प्राधान्य, निधीत 40 टक्क्यांची वाढ
  • - प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष भर, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवणार
  • - मानवरहित क्रॉसिंगसाठी भरीव निधी
  • - ऑटोमॅटिक दारं बसवणार, बायो-टॉयलेट बांधणार
  • - निवडक गाड्यांमध्ये वाय-फाय

नव्या गाड्या

  •  5 जनसाधारण आणि 5 प्रिमिअम गाड्यांची घोषणा
  • - मुंबई-गोरखपूर जनसाधारण नवी गाडी
  • - मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेस
  • - 6 एसी, 27 एक्स्प्रेस, 8 पॅसेंजर गाड्यांची घोषणा
  • - नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी ट्रेनची घोषणा
  • - हुजूरसाहेब-नांदेड एक्स्प्रेसची घोषणा
  • - मुंबई-पटियाला ट्रेनची घोषणा
  • - नागपूर-पुणे साप्ताहिक नवीन ट्रेनची घोषणा
  • - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
  • - गदक-पंढरपूर नवीन गाडी
  • - ईशान्य भारतात रेल्वेच्या विस्तारासाठी 54% अधिक तरतूद

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • SACHIN

    media shant aahe

  • yogesh

    mantri kunihi aso aani party kuthlihi aso maharashtrala fakt ghantach milto

close