रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट काँग्रेस नेत्याने पायदळी तुडवली

July 8, 2014 7:23 PM0 commentsViews: 975

22congress_delhi_rail_budget08 जुलै : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलं. मात्र या बजेटवर संतप्त होतं एका काँग्रेसच्या नेत्याने दिल्लीत गौडा यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं केली आणि गौडा यांची नेमप्लेटच पायदळी तुडवली.

बजेट सादर केल्यानंतर नवी दिल्लीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंह लवली, मुकेश शर्मा आणि हारुण युसूफ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. यावेळी मुकेश शर्मा या कार्यकर्त्याने गौडा यांच्या घराबाहेर असलेली नेमप्लेट काढली आणि पायदळी तुडवली.

गौडा यांनी बुलेट ट्रेनची घोषणा करुन जनतेची दिशाभूल करत आहे. रेल्वेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप काँग्रेस नेते हारुण युसूफ यांनी केला. तर रेल्वे बजेट निराशजनक असून यात सुविधांवर लक्ष देण्यात आलं नाही असा आरोप काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close