प्रभाकरन श्रीलंकेतून पळून गेल्याची शक्यता – श्रीलंकन लष्कर

April 24, 2009 5:12 PM0 commentsViews: 8

24 एप्रिल, कोलंबो तामिळ बंडखोर प्रमुख प्रभाकरन श्रीलंकेतून पळून गेल्याची शक्यता श्रीलंकन लष्करानं व्यक्त केली आहे. एलटीटीईचा मोठा शस्त्रसाठा जप्त करून दहा बंडखोर तामिळी वाघांना मारल्याचा दावाही श्रीलंकन लष्करानं केला आहे.प्रभाकरनला पकडण्यासाठी श्रीलंकन लष्कराने नो फायरिंग झोनमध्ये प्रवेश केला आहे. याच नो फायरिंग झोनमध्ये प्रभाकरन नागरीभागात लपून बसल्याचा दावा लष्करानं केला आहे. दरम्यान या नो फायरिंग झोनमधून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 75 हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच प्रभाकरनला पळण्यासाठीचे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याचाही दावा श्रीलंकन लष्करानं व्यक्त केला आहे.श्रीलंकन लष्कर प्रभाकरनपासून केवळ 6 ते 8 किलोमीटर दूर आहे. मुलैतिवूमधल्या व्हेल्ला-मुल्ली-वैकल भागात प्रभाकरन लपून बसण्याची शक्यता असल्याचाही अंदाज लष्कर व्यक्त करत आहे. व्हेल्ला-मुल्ली-वैकल या भागात श्रीलंकेच्या नेव्हीनं कारवाई सुरू केलीय. पण अजूनही एलटीटीई बंडखोर याठिकाणी लष्कराशी लढा देतायत. गेल्या तीन दिवसांत एक लाख लोकांना या भागातून बाहेर काढण्यात आलंय. या संघर्षात एक हजार लोक ठार झालेत तर 15 हजार जखमी झालेत. दरम्यान, श्रीलंका लष्करानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्या व्हिडिओमध्ये नो फायर झोनमध्ये एलटीटीईनं हजारो लोकांना ओलिस ठेवलं असल्याचं श्रीलंकन लष्काराला दिसलं आहे.

close