तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचं पंढरपुरात आगमन

July 8, 2014 9:20 PM0 commentsViews: 241

08 जुलै : तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आपला वाखरीचा मुक्काम आटपून पंढरपुरच्या दिशेने सोबतच निघाल्या होत्या आणि आता पंढरपुरात दोन्ही पालख्यांचं आगमन झालेलं आहे.
पहिला नमस्कार इसाव्यापासी केला
देवा माज्या इट्टलाचा कळस सोन्याचा पाहिला
वाट हि चालावी पंढरीची
टाळी वाजवावी गुढी उभारावी
पंढरीची वाट मळवदी पेठ
मिळाले चतुष्ट वारकरी
पताकांचे हार मिळाले अपार
होतो जयजयकार भीमातीरी,
असं वातावरण आता पंढपुरात पाहायला मिळतंय. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने पंढरी दुमदुमली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्याच्या शासकीय पुजेकरिता सपत्नीक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close