नेतृत्वबदलाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही – मुख्यमंत्री

July 8, 2014 9:28 PM0 commentsViews: 379

7568cm_on_voting_list08 जुलै : राज्यात पुन्हा एकदा नेतृत्वाबद्दलाची चर्चा सुरू झालीय मात्र खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. नेतृत्वबदलाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. ऐ.के. अँटोनी समितीच्या रिपोर्टनंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी नेतृत्त्वबदलासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची शक्यता होती. मात्र या चर्चेला मुख्यमंत्र्यांची पूर्ण विराम दिलाय. लोकसभेत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्यात काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातूनच मुख्यमंत्री हटवण्यात यावे अशी मागणी झाली होती.

पण काँग्रेस हायकमांडने ही मागणी फेटाळून लावली. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्री बदलण्यात यावा असा आग्रह होता पण तरीही मागील आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून अभय मिळाला.

पण अँटोनी समितीने आपला अहवाल आता पक्षाध्यक्षांकडे मांडणार असल्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. आता ही शक्यताच मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close