अखेर भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह विराजमान

July 9, 2014 1:40 PM1 commentViews: 881

09july_amit_shah09 जुलै : अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपच्या अध्यक्षपदाची माळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास निकटवर्तीय अमित शाह यांच्या गळ्यात पडली. आज (बुधवारी) भाजपची संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने अमित शहा यांच्या नावावर सहमती दर्शवण्यात आली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि मावळते राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींही उपस्थित होते. उत्तरप्रदेशात भाजपला मिळालेला विजय हा शाह यांच्यामुळेच आहे. ते एक उत्तम संघटक आहे त्यांच्या नेतृत्वाचा भाजपला नक्की फायदा होईल असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे.

राजनाथ यांनी मंत्रीपद स्वीकारल्यामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. भाजपची प्रगती ही अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे होऊ शकली अशी स्तुतीसुमनंही सिंह यांनी उधळली. अमित शाह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

अमित शाह यांची राजकीय कारकीर्द

 • - अहमदाबादमधल्या नाराणपुरा भागातले आमदार
 • - सध्या भाजप सरचिटणीस
 • - गुजरातचे माजी गृहमंत्री
 • - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय
 • - लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे शिलेदार
 • - शाह यांच्या नेतृत्वाखाली यूपीत 71जागांवर विजय
 • - यापूर्वी लालकृष्ण अडवाणींच्या प्रचाराची धुरा सांभाळली
 • - 2003मध्ये शाहांकडे गुजरात सरकारमधली 10 खाती

शाहांची वादग्रस्त बाजू

 • - सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटर प्रकरणात आरोपी
 • - तुलसीराम प्रजापतींची हत्या केल्याचा आरोप
 • - तुलसीराम सोहराबुद्दीन प्रकरणातले साक्षीदार
 • - 2009 साली एका महिलेवर पाळत ठेवल्याचा शाहांवर आरोप

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aditya

  बीजेपी का नाम बदल कर बगपी ( भारती गुजरात पार्टी) रखना चाहये। अब देश में वही होगा जो गुजरती चाहे गए बाक़ी सब को मिले गा बाबा जी का ठुल्लु। जय महारष्ट्र

close