श्रीलंकेत लिट्टेविरोधात युद्ध अजूनही सुरू

April 24, 2009 5:33 PM0 commentsViews: 2

24 एप्रिल, कोलंबो श्रीलंकेत लिट्टेविरोधात युद्ध अजूनही सुरू आहे.पण प्रभाकरन कुठे आहे, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नाहीये. श्रीलंकेच्या लष्करानुसार प्रभाकरन पाणबुडीतून प्रवास करून लंकेच्या बाहेर पळाला असल्याची शक्यता आहे. तर लिट्टेंचं म्हणणं आहे की ते लंकेच्या लष्कराला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान भारताने श्रीलंकेत पाठवलेले विशेष दूत शिवशंकर मेनन आणि एम.के. नारायणन कोलंबोहून परतले आहेत. त्यांनी निष्पाप लोकांचे जीव जात असल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. पण ताबडतोब युद्धबंदी करावी, अशी मागणी मात्र केली नसल्याचं आहे.

close