‘नॅशनल हेराल्ड प्रकरणी एनडीए सूडबुद्धीने वागतंय’

July 9, 2014 5:55 PM0 commentsViews: 1211

32sonia_on_modi09 जुलै : नॅशनल हेराल्ड प्रकरणी एनडीए सरकार राजकीय सूडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलाय.

नॅशनल हेराल्ड या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या विक्रीप्रकरणी गैरव्यवहार केल्याच्या संशयावरून आयकर खात्याने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

दिल्ली कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावून 7 ऑगस्टला हजर रहायला सांगितलंय. मात्र, सरकार अशा प्रकारे सूडबुद्धीने वागल्यास काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल असा इशाराही सोनिया गांधी यांनी दिलाय.

नॅशनल हेराल्डची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल्स ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी यांच्या मालकीच्या यंग इंडियन लिमिटेड या कंपनीला विनातारण कर्ज दिल्याच्या आरोपात तथ्य असल्याचं दिल्ली कोर्टाला प्रथमदर्शनी आढळलंय.

तर भाजपनेही सोनियांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. जर आम्ही राजकीय सूडबुद्धीने वागायचं ठरवलं तर सोनिया गांधींना लपायला जागा मिळणार नाही असा पलटवार भाजपने केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close