नांदगावकर-कदम यांच्यामध्ये खडाजंगी

July 9, 2014 5:04 PM0 commentsViews: 4602

09 जुलै : येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच धुसफुस सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचेे नेते रामदास कदम अणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर एकाच दिवशी लातुर शहरात आले होते. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर चांगलीच आगपाखड केलीय. येत्या निवडणुकीत मनसेला जनतेनं अगोदरच औकात दाखवली आहे आता उरली सुरली औकात दाखवण्याची भाषा कदम यांनी केली. याला बाळा नांदगावकर यांनी मनसे स्टाईलने प्रत्युत्तर दिलं. कदम यांच्यासोबत मी अगोदर काम केलं होत पण ‘बाप से बेटा सवाई होता है’ असा टोला नांदगावकर यांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close