…आणि लोकसभेत राहुल गांधी झोपले

July 9, 2014 6:23 PM2 commentsViews: 7456

12rahul_sllep_loksabha09 जुलै : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला पण या पराभवातून काँग्रेसने कोणतही धडा घेतला नसल्याचं दिसून येतंय. मोदी सरकार देशाच्या 2014-15 चा अर्थसंकल्प उद्या सादर करणार आहे. याबाबत लोकसभेत महागाईच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत चक्क डुलक्या काढताना दिसले.

चर्चेमध्ये भाग घेणारे सीपीएमचे नेते पी.करुणाकरन हे आपला मुद्दा मांडत असताना त्यांच्या मागच्या सीटवर बसलेले राहुल गांधी झोपले होते. विशेष म्हणजे महागाईच्या सारख्या महत्वाच्या मुद्यावर भाजप नेत्यांनी यूपीए सरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता उलटच चित्र पाहण्यास मिळतंय. एकीकडे काँग्रेस विरोधीपक्षनेतेपदासाठी धावापळ करतंय तर लोकसभेत खुद्ध उपाध्यक्ष झोपा काढत आहे. यामुळे राहुल गांधी यांची आणखी नाचक्की होणार हे स्पष्ट आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Dr.Annasaheb Shinde

    rahul gandhi serious vha aata tari ; nahitar baapane kamivale aani porane ghalavale aase hoeil

  • Pankaj Patni

    te nehamich jhopat alet mhanun tar aaj deshachi hi avastha ahe…
    tyana jaag fakt techach yete jevha tyana tyancha bank balance kami hotana disto…

close