माजी राज्यमंत्री सुनील देशमुख भाजपच्या वाटेवर?

July 9, 2014 9:26 PM0 commentsViews: 976

 76sunil deshmukh09 जुलै : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून नाराज आणि ‘बंडोबा’ सक्रिय झाले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत सत्ता परिवर्तनाचे निकष पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरलीय.

माजी जलसंपदा राज्यमंत्री सुनील देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याचबरोबर अपक्ष आमदार अनिल बोंडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. दुसरीकडे माजी आमदार दिलीप येळगावकर हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत.

लवकरच या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. तर ज्यांना ज्यांना भाजपमध्ये येऊ वाटत आहे त्यांच्यासाठी दार उघडे आहे त्यामुळे पक्षाला मजबुती मिळेल. अनेक पक्षांचे मातब्बर नेते आमच्या संपर्कात आहे आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील असा खुलासा खुद्ध भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close