अनिल अंबानींची हत्या करण्याचा विरोधकांचा डाव

April 24, 2009 5:41 PM0 commentsViews: 4

24 एप्रिल, मुंबईअनिल धीरुभाई अंबानी यांच्या हेलीकॉप्टरमध्ये जाणूनबुजून बिघाड घडवून आणून त्यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या संशयितांविरुद्‌ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा अनिल अंबानी यांच्या हेलीकॉप्टरचे आणि रिलायन्स ट्रान्सपोर्टचे सिनिअर पायलट कॅप्टन आर.एन.जोशी यांनी दाखल केला आहे. कॉर्पोरेट जगतामधील काही हितशत्रूंनींच हा घातपात घडवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय अनिल अंबानी ग्रुपनं व्यक्त केला आहे.अनिल अंबानी हे हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते आणि तेच हेलीकॉप्टर मुंबई विमानतळावर उभं होतं. सोळा लोक बसण्याची क्षमता असलेलं हे हेलिकॉप्टर काल रात्री दुरुस्तीसाठी एअरवर्क्स कंपनीत आणण्यात आलं होतं आणि दुरुस्तीनंतर ते पुन्हा रिलाअन्स एअर समूहाला परत करण्यात येणार होतं. पण त्याच्या गिअरबॉक्समध्ये कचरा आणि चिखल भरला असल्याचं एअरवर्कस्‌च्या एका कर्मचार्‍याच्या लक्षात आलं. एडीएजी ग्रुपच्या अन्य काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जीवालाही धोका असल्याची शक्यता व्यक्त होतेय. या संदर्भात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय तसंच एअरवर्क्स कंपनीनंही त्यांच्या एका कर्मचार्‍याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

close