काय होणार महाग,काय होणार स्वस्त ?

July 10, 2014 3:49 PM1 commentViews: 12585

90union_budget201410 जुलै : मोदी सरकार तख्तावर विराजमान झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली आणि आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. ‘सबका साथ सबका विकास’ नारा देत अर्थसंकल्प सादर केलाय. कर दरात फारशी वाढ न करता नोकरदारांना दिलासा दिलाय.

पण सर्वसामान्यांच्या दैनदिन जीवनात वापरणार्‍या वस्तू नेहमी प्रमाणे काही महाग झाल्या आहेत तर काही स्वस्त झाल्या आहेत. 19 इंचापेक्षा कमी असलेले एलसीडी, एलईडी,टीव्ही स्वस्त होणार आहे. सौर आणि पवन ऊर्जा उपकरणं, भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त आणि बूट स्वस्त होणार आहे.

त्याचबरोबर रेडिमेट कपडे, सौंदर्य प्रसाधनं, इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिगारेट, पानमसाला, तंबाखू, गुटखा महागणार आहे. सिगारेटचे दर जवळपास 17 टक्यांनी महागणार आहे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

काय होणार महाग

 • विदेशी बनावटीच्या वस्तू
 • इम्पोर्टेड इलेक्ट्रॉनिक वस्तू
 • सिगारेट, पानमसाला
 • तंबाखू, गुटखा
 • रेडिमेट कपडे
 • सौंदर्य प्रसाधनं
 • कोल्ड्रिंक्स
 • विदेशी स्टीलची भांडी
 • विदेशी मोबाईल
 • कोळसा महाग

काय होणार स्वस्त

 • बूट स्वस्त
 • तेल, साबण
 •  सौर आणि पवन ऊर्जा उपकरणं
 • भारतीय बनावटीचे मोबाईल
 • 19 इंचापेक्षा कमी असलेले LCD/LED/ TVs

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Pratik Pathare

  oks thanks for the info

close