छोटा राजनची समाजवादी पार्टीला धमकी

April 24, 2009 5:51 PM0 commentsViews: 1

24 एप्रिल, मुंबई संजय दत्तला गुरुदास कामत यांच्या विरोधात प्रचारात उतरवू नका अशी धमकी छोटा राजननं दिली असल्याचा गौप्यस्फोट मुंबईतल्या रॅलीत अमरसिंगांनी केला. याबाबत आपण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नारायणन तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सांगितल्याचं अमरसिंह यांनी सांगितलं. या निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसनं, समाजवादी पक्षाला मदत केल्याचा खुलासा, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी केलाय.

close