नारायण राणे यांनी सीआयडी अधिकार्‍यांची घेतली भेट

April 25, 2009 7:07 AM0 commentsViews: 2

25 एप्रिल दिनेश केळुसकर, रत्नागिरीकाँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सीआयडी अधिकार्‍यांची स्वत: जाऊन भेट घेतली. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये सुमारे अर्धा तास ते राणे पोलीस अधिकार्‍यांसोबत चर्चा करत होते. अंकुश राणे खून तपासाबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांनी पोलिस आणि सीआयडी अधिकार्‍यांची भेट घेतली असल्याचं समजतंय. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या गूढ मृत्यूचा तपास सीआयडी अजून करत आहे. पण त्याबद्दल अजून कोणताही तपशील देता येणार नसल्याचं सीआयडीचे महाअधिक्षक विकास सावरकर यांनी सांगितलं आहे.

close