बजेटमध्ये ‘गर्जा महाराष्ट्र’!

July 10, 2014 7:07 PM0 commentsViews: 4220

as22union_budget_for_maharashtra10 जुलै : ‘अच्छे दिन’ असं गोड स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर विराजमान झालं. मोदी सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केलाय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वांना खूश करत समांतर असा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या काळात मोदी सरकारने दिलेल्या घोषणाची छाप अर्थसंकल्पावर दिसून आली. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रासह इतर राज्यासाठी खास घोषणा करण्यात आल्यात. यात खास करुन शिक्षण, शहरांचा विकास आणि महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला.

मुंबईसह महाराष्ट्रासाठी काही घोषणा करण्यात आल्यात. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत पायाभूत विकास कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करणार अशी ग्वाही देण्यात आली. तर विदर्भात  एम्स (AIIMS) प्रस्ताव मांडण्यात आलाय.  पण हे भाजपचे नेते आणि रस्ते, परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरमध्ये उभारले जाण्याची शक्यता आहे.

1 हजार स्मार्ट शहरं विकासित करण्याची घोषणा करण्यात आलीय. या शहरांच्या विकासासाठी 7 हजार 60 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. यात महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचाही समावेश आहे.याचा फायदा नाशिक, पुणे, नागपूर आणि ठाणे या शहरांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर पुण्यात बायोटेक्नॉलॉजी क्लस्टर सेंटर सुरू करणार आहे. आणि नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर योजनेचं मुख्यालयही पुण्यात असणार आहे यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आलीय. तसंच पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन संस्था FTII ला राष्ट्रीय संस्थेचा दर्जाही देण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला…

  • - विदर्भात AIIMS चा प्रस्ताव
  • - पुण्यातल्या FTII ला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा
  • - पुण्यात बायोटेक्नॉलॉजी क्लस्टर सेंटर सुरू करणार
  • - नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर योजनेचं मुख्यालय पुण्यात, 100 कोटींची तरतूद
  • - मुंबई पायाभूत विकास कार्यक्रम नियोजित वेळेत पूर्ण करणार
  • - 1 हजार स्मार्ट शहरं विकासित करणार या शहरांच्या विकासासाठी 7 हजार 60 कोटी निधीची तरतूद
  • - पीपीपी मॉडेलनुसार महाराष्ट्रातील अनेक शहरांचा विकास
  • - विदर्भात एम्स उभारले जाणार
  • - क्रीडा विकास कार्यक्रमाचे केंद्र पुणे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close