किंग्ज इलेव्हन पंजाबची बंगलोर रॉयल चॅलेंजर्सवर मात : किंग्ज इलेव्हन पंजाबचा पहिला विजय

April 25, 2009 7:15 AM0 commentsViews: 1

25 एप्रिल ओपनिंगला आलेल्या रवि बोपाराच्या तुफान खेळीच्या जोरावर अखेर किंग्ज इलेव्हननं आयपीएलच्या दुसर्‍या हंगामातल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. किंग्ज इलेव्हननं बंगलोर रॉयलचा तब्बल 7 विकेट राखून पराभव केला. रवि बोपारानं शानदार खेळी करत 59 बॉलमध्ये 84 रन्स केल्या. त्याला संगकारानं 26 तर करण गोयलनं 19 रन्स करत चांगली साथ दिली. नाबाद 30 रन्सची खेळी करणार्‍या कॅप्टन युवराज सिंगनं किंग्जच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.पहिली बॅटिंग करत बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनं 9 विकेट गमावत 168 रन्स केल्या. जॅक कॅलिसनं 46 बॉलमध्ये 65 रन्स करत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. पण त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. कॅप्टन केविन पीटरसन दुसर्‍यांदा रन्सचं खातंही न उघडता आऊट झाला. तीन मॅचेसमध्ये किंग्ज इलेव्हनचा हा पहिलाच विजय ठरला असून टीमची मालक प्रिती झिंटाच्या चेहर्‍यावर हसू फुललं. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा चार मॅचमधला हा सलग तिसरा पराभव आहे.

close