राज्यात पृथ्वी’राज’च !

July 10, 2014 9:46 PM0 commentsViews: 693

8cm prithviraj chavan10 जुलै : गेल्या काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद जाणार’ या चर्चेला उधाण आलं होतं अखेर आता या चर्चांवर पडदा पडलाय.

पृथ्वीराज चव्हाण हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढवल्या जातील असं राज्याचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पीटीआयला सांगितलंय.

लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार होती. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांना हटवण्याची मागणी केली होती. बुधवारी मुख्यमंत्री अचानक नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला गेले होते.

तिथं त्यांनी 2 दिवस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आज ते राहुल गांधी यांनाही भेटले.

अखेर पृथ्वीराज चव्हाण यांना अभय मिळाल्याचं आज संध्याकाळी जाहीर करण्यात आलं. एवढंच नाहीतर आगामी विधानसभा निवडणूकही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असंही जाहीर करण्यात आलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close