पहिल्या इनिंगमध्ये भारत 457 वर

July 11, 2014 10:27 AM0 commentsViews: 1040

shami_afp11  जुलै : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टेस्टमध्ये भारताने पहिल्या इनिंगमध्ये 457 रन्स केले आहेत. भारताची शेवटची जोडी भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी केलेल्या 111 रन्सच्या पार्टनरशिपमुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये 457 पर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांनीही आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली.

दुसर्‍या दिवसअखेरीस इंग्लडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन ऍलिस्टर कूकच्या मोबदल्यात 43 रन्स केले. त्यामुळे इंग्लंड अजूनही 414 रन्सनं पिछाडीवर आहे.

शतकवीर मुरली विजय 146 रन्सवर आऊट झाला तर कॅप्टन धोणी 82 रन्सवर आऊट झाला. भारताच्या 346 रन्सवर 9 विकेट गेल्या होत्या पण तळाच्या मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या शानदार हाफ सेंच्युरीमुळे भारताने 457 रन्सची मोठी धावसंख्या इंग्लंडसमोर उभारली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close