‘फाइंडिंग फॅनी’ची पहिली झलक

July 11, 2014 2:05 PM0 commentsViews: 1807

11  जुलै :  दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूरचा ‘फाइंडिग फॅनी’ची पहिली झलक नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दीपिका आणि अर्जुनची जोडी प्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात दीपिका आणि अर्जुनसोबतच नसीरुद्दिन शाह, पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांची महत्वाची भूमिका असणार आहे.’बिंग सायरस’ आणि ‘कॉकटेल’सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा होमी अदजानिया याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 12 सप्टेंबरला हिंदी आणि इंग्लीश अशा दोन्ही भाषेत रिलीज होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close