नॅनोचं बुकिंग संपणार : आज शेवटचा दिवस

April 25, 2009 8:03 AM0 commentsViews: 6

25 एप्रिलआज नॅनोच्या बुकिंगचा शेवटचा दिवस आहे. धुमधडाक्यात आलेल्या या 'पिपल्स कार'च्या बुकिंगला मात्र अपेक्षेपेक्षा कमीच प्रतिसाद मिळाल्याची चर्चा सध्या मार्केटमध्ये आहे. एक लाख किंमतीपासून सुरू होणार्‍या या नॅनोच्या बुकिंगसाठी ग्राहकांचा उत्साह पहिल्या काही दिवसानंतर कमी झाल्याचं चित्रं सध्या दिसतंय. बँकांमध्येही काही हजारांच्या संख्येतच बुकिंग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर कंपनीकडून आणलेले निम्मे बुकिंग फॉर्म्स परत करावे लागणार असल्याची माहितीही काही डिलर्सनी दिली आहे. गेल्या नऊ एप्रिलपासून नॅनोचं बुकिंग सर्व डिलर्सकडे आणि टाटा ग्रुपच्या सर्व शोरुम्समधून सुरू करण्यात आलं होतं. देशभरात सर्वांचीच उत्सुकता प्रचंड ताणल्यानंतर अखेरीस 23 मार्चला नॅनो मार्केटमध्ये दाखल झाली होती. पण मार्केटमधली ही शानदार नॅनो खरोखरच किती जणांची 'पिपल्स कार' ठरली याची उत्सुकता आहे.

close