समुद्राला भरती

July 11, 2014 3:08 PM0 commentsViews: 2752

11  जुलै :  मुंबईत आज सकाळपासून संततधार सुरू आहे. मुंबईतच्या समुद्रात सकाळी 11.25 मिनिटांनी भरती आली होती. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरांमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पाऊस सुरू असून आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close