राज बरसले, नरेंद्र मोदींची हवा विरली !

July 11, 2014 4:00 PM0 commentsViews: 9463

109raj_on_modi11 जुलै : नेहमी मोदींचे गुणगान गाणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यावरच सडकून टीका केलीय. नरेंद्र मोदींची हवा विरली आहे. मोदींना डोक्यावर घेणारा सोशल मीडिया आज त्यांच्याच विरोधात लिहितोय अशी टीका राज ठाकरे यांनी केलीय. त्यामुळे सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही राज ठाकरे यांनी मनसेच्या युवा कार्यकर्त्यांना दिलाय.

मुंबईत मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय यावेळी ते बोलत होते. येणार्‍या काळात यावेळी बदल ओळखून काम करा, राजकारणात दुकानदारी करू नका, असाही सल्लाही राजनी दिलाय. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदींवर प्रेम सर्वश्रूत आहे. जाहीर सभांमधून राज यांनी अनेक वेळा मोदींचं कौतुक केलं.

एवढंच नाहीतर लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी जाहीर पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या प्रचारात राज यांनी अनेक वेळा मोदींच्या पंतप्रधानपदासाठी स्तुतीसुमनं उधळली होती. आता तेच राज ठाकरे मोदींवर टीका करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close