ठरलं, सप्टेंबरमध्ये मोदी अमेरिकेला जाणार !

July 11, 2014 4:30 PM0 commentsViews: 748

v42usa_obama11 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीसाठी अमेरिकेने मोदींना निमंत्रण दिलं होतं. अखेर मोदींनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, मोदी अमेरिकेला जाणार का या विषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

2005 मध्ये अमेरिकेने मोदींचा व्हिसा नाकारला होता. पण आता मोदी पंतप्रधान होताचं अमेरिकेचे त्यांच्या विषयी मतपरिवर्तन झाल्याचं दिसतंय. मोदींच्या शपथविधीसाठीही ओबामांनी त्यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याच वेळी या भेटीचं निमंत्रणही देण्यात आलं होतं.

 एवढंचनाहीतर, मोदी आता ए-1 व्हिसावर अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार प्रत्येक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ए-1 व्हिसा मिळतो, मोदी पंतप्रधान झाल्याने आता तेही या व्हिसाचे मानकरी आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close