मराठी बोलणार्‍या विद्यार्थ्यांना मारहाण करणारा संस्थाचालक अटकेत

July 11, 2014 2:48 PM0 commentsViews: 2025

Bhosri_school_marathi11 जुलै : मातृभूमीत मराठी भाषेचा अभिमान सर्वांनाच असतो पण सांस्कृतीक शहर पुण्यात याच्या उलट घडलंय. मराठीमध्ये बोलला म्हणून एका संस्थाचालकाने आपल्याच विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. पुण्यातील भोसरी येथील प्रियदर्शनी शाळेत हा प्रकार घडला. या प्रकरणी आता संस्थाचालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

भोसरी पोलिसांनी आज (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संस्थाचालक जितेंद्र सिंगला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. भोसरीतील प्रियदर्शीनी शाळेत आठवीच्या वर्गातील 28 विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या तासाला मराठीत बोलल्यामुळे मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठे पर्यंत मारहाण करण्यात आली होती हा प्रकार चाईल्ड लाईन संस्थेकडे आलेल्या निनावी फोनमुळे समोर आला.

संस्थेने विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंग यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ही अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close