राजना आगामी निवडणुकीत मोदी लाट कळेल -फडणवीस

July 11, 2014 8:36 PM1 commentViews: 2882

11fadanvis_on_raj11 जुलै : …असं असेल तर राज ठाकरे यांना येणार्‍या निवडणुकीत मोदींची लाट काय आहे ती नक्की कळेल असं सणसणीत प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलंय.

तसंच लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा सर्वांना माहित आहे. मोदी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा भाजपला 200 जागा मिळतील असा अंदाज बांधत होते पण निकाल काय लागला हे जगजाहीर आहे. त्यांनी जनतेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केलाय त्यामुळे मोदी लाट ओसरण्याचा प्रश्नच नाही असंही फडणवीस यांनी बजावून सांगितलं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मोदी प्रेम सर्वश्रूत आहे. अनेक सभांमधून राज यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. एव्हाना लोकसभा निवडणुकीत तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊन लोकसभा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं पण त्यात जनतेनं मनसेलाच ‘औकात’ दाखवत चांगलंच तोंडावर पाडलं. पण आज अचानक राज यांनी युटर्न घेत मोदींवर तोफ डागली. नरेंद्र मोदींची हवा आता विरली आहे. मोदींना डोक्यावर घेणारा सोशल मीडिया आज त्यांच्याच विरोधात लिहितोय अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मोदींच्या बाबतीत सोशल मीडियाचा अंदाज घेऊन राज यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, असा सल्लाही आपल्या युवा कार्यकर्त्यांना दिला. मात्र राज यांच्या टीकेवरुन भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत येणार्‍या निवडणुकीत मोदींची लाट काय आहे ते पाहाच असा खणखणीत टोला लगावलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • PRATHAMESH PATWARDHAN , MUMBAI

  काही गोष्टी सर्व वाचकांनी भावना बाजूला ठेऊन कृपया लक्ष्यात घ्याव्या.
  १) देशात कॉंग्रेस विरोधी लाट होती हे सत्य आहे. म्हणजे ती मोदी लाट होती असे नव्हे. मोदींनी गुजरातच्या विकास भारतीय मतदारांपुढे विकला हे वास्तव आहे.आणि त्यात अनेक राज्यातील मतदारांनी भाजप च्या बाजूने कौल दिला हे हि वास्तव आहे. तसा तो देण गरजेचं होतं. याचा अर्थ भाजप ची सर्व भारत भर लाट आहे. केरळ , पश्चिम बंगाल , उडीशा, आंध्र , इतर काही उत्तर पूर्व मधली राज्ये इथे भाजप ची लाट अजिबात नव्हती हे मान्य करायला हवे ( कदाचित मोदी प्रेमात आंधळे झालेले हे मान्य करणार नाहीत ).
  २) तसेच जिथे भाजप चे उमेदवार जास्त निवडून आले तिथे मोदी प्रभाव जरी असला तरिओ देखील त्या त्या राज्यांमध्ये तेथील भाजप चे नेतृत्व कणखर आहे. शिवराज सिंघ चौहान , रमण सिंघ , वसुंधरा राजे , येडीयुराप्पा( आवडो न आवडो ) हे कणखर आहेत मिळालं हे देखील तेवढच वास्तव आहे. पंजाब मध्ये पण शिरोमणी अकाली दल सक्षम आहे म्हणून भाजप ला त्याचा फायदा झाला. फक्तं मोदी लाट असती तर जेटली आपटले नसते.
  ३) महाराष्ट्रामध्ये आपल्या मायबाप सरकार ने जे घोटाळे केले त्याच फळ या निवडणुकीतून जनतेने दिलं. अनेक सत्ताधारी नेत्यांनी आपापला जिल्हा आपली जहागीर आहे या थाटात मिरवत होते. ते पडले हे खरच चांगल झालं.
  ४) पण खास करून फक्तं मोदींचे ( शिवसेना किंवा भाजप चे नव्हे ) पाठीराखे असा एक वर्ग आहे हे सगळ्यांनी लक्ष्यात घ्यावे. त्यामुळे अनेक उमेदवार हे केवळ मोदींच्या पक्षात आहेत म्हणून निवडून आले हे देखील वास्तव आहे. महायुतीच्या अनेक उमेदवार हे लायकी नसताना देखील निवडून आले हे कटू सत्य आहे. याचा अर्थ हा कौल महायुतीच्या बाजूने पूर्णपणे होता असे नव्हे.तर तो मोदींच्या बाजूने होता. हे कृपया लक्षात घ्यावे.
  ५) त्यामुळे सोशिअल मिडिया वर उन्मादासारखे कृपया स्वतः ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांनी तरी वागू नये.
  ६) आता राहता राहिला प्रश्न राज ठाकरेंचा,त्यांची पक्ष बांधणी नीट नाही हे सत्य , दुसर्या फळीचे नेते कमी आहेत हे सत्य , मधेच ते काही दिवस शांत असतात हे पण सत्य पण ते केवळ महायुतीत नव्हते म्हणून पराभव झाला. ते जर महायुतीत असते तर त्यांचेही उमेदवार निवडून आले असते. या बाकीच्या गोष्टी गौण ठरल्या असत्या.
  ७) भाजप ने पण एक गोष्ट लक्षात घ्यावी कि तुम्हाला जर सत्ता हवी असेल तर भाजप चे इतर राज्यात जसं कणखर नेतृत्व आहे तसा आपल्या महाराष्ट्रातही देणं गरजेचं आहे. कृपया फक्तं मोदींच्या नावे मत मागायला येऊ नये. अनेक मोदींच्या पाठीराख्यांना ( खास करून आभासी सोशिअल मिडियावरील ) भाजप च्या इतर नेत्यांची नावे हि माहिती नाहीत हे कटू असलं तरी सत्य आहे. हे आपण सर्वानीच लक्षात घ्यावं.
  ८) सत्ता काबीज करायची असेल तर महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावाच लागेल. इतर राज्यांमध्ये तो केला होता( अर्थात तिथे ५-५ पक्षांची युती नव्हती.). काही लोकांना तर शिवसेना आणि भाजप ने उगाच डोक्यावर घेतला आहे. आयटम गर्ल ज्या पक्षात आहे अशा फुटकळ पक्षांची मदत घ्यावी लागते हे खर म्हणजे शिवसेना आणि भाजप चा अपयश आहे. इतके वर्ष तुम्ही राज्य स्तरावर युतीच म्हणून एक कणखर नेतृत्व का नाही देऊ शकलात. प्रत्येक वेळी जागा वाटपावरून वाद घालायचे. हे योग्य नव्हे. आणि हे वाद इतक्या टोकाला घेऊन जायचे कि संसार तोड्याची भाषा करायची.आणि आपापल्या व्यासपीठावरून स्वबळावर निवडणूक लढवायची घोषणा ( यांच्या भाषेत कार्यकर्त्यांची इच्छा ) इथपर्यंत मामला जातो.हि परिस्थिती बरी नव्हे.
  ९) राज ठाकरे जे बोलले ती टीका म्हणायची का तो भाजप ला दिलेला सल्ला हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण ते जे काही बोलले त्याकडे बुद्धिवादी भाजप ने दुर्लक्ष करू नये.१०)
  भाजप ने आणि प्रत्येक पक्षाने आपल्या ट्विटरवीर आणि फेसबुकवीर उन्मादी कार्यकर्त्यांवर जरा अंकुश ठेवावा. या बाबतीत राज ठाकरे अभिनंदनास पात्रं ठरतात हे नक्की.

close