‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

April 25, 2009 9:35 AM0 commentsViews: 3

25 एप्रिल मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या मास्टर दीनानाथ पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. कला क्षेत्रातील दिग्गज मंडळी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.जेष्ठ रंगकर्मी चित्तरंजन कोल्हटकर यांना नाट्यसृष्टीतील सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. उस्ताद राशीद खान यांना प्रदीर्घ संगीत सेवेसाठी तर जावेद अख्तर यांना साहित्य सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांना शांता शेळके स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आलं. मोहन वाघ यांच्या चंद्रकला संस्थेच्या प्रेमगंध या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनेता परेश रावल यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समाजिक कार्यासाठी निवड झालेल्या मुंबई पोलीसांना 'आनंदमयी पुरस्कार' आणि अग्निशामक दलाला 'मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'प्रदान करण्यात आला. त्यांच्या अविरत कार्याला सलाम करून लता मंगेशकर यांच्यातर्फे विशेष दोन लाख रुपयांचा वैयक्तिक मोलाचा ठेवाही यावेळी देण्यात आला.प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र, मानचिन्ह आणि 50,000 रु. रोख असं या पुरस्कारांचं स्वरुप होतं. या वेळी देवकी पंडित, पंडित हृदयनाथ मंगेशकर, बेला शेंडे यांसारख्या गायकांनी आपली सुमधुर गाणी सादर केली. ज्येष्ठ श्रेष्ठ कलागुणसंपन्न व्यक्तिंचा हा सन्मान सोहळा षण्मुखानंदच्या प्रांगणात पार पडला.

close